पत्रकिरतेत टीव्ही, वृत्तपत्रे या माध्यमांप्रमाणेच आता वेब
पत्रकारितादेखील पुढे येत आहे. आज अनेक देशांमधील वृत्तपत्रे
बंद झाली असून तेथे केवळ वेब पत्रकारिती हा प्रकारच प्रचलित आहे. त्यामध्ये सीएनएन,
एनडीटीव्ही, बीबीसी अशा न्यूज चॅनलच्या वेबसाईट, टाईम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान
टाईम्स, डीएनए अशा न्यूजपेपरच्या वेबसाईट तसेच पीटीआय, टीएनएन अशा न्यूज
एजन्सीच्या वेबसाईट यांचा समावेश आहे.
इंग्रजी वेब पत्रकारितेप्रमाणेच
आता मराठी वेब पत्रकारितादेखील हळूहळू पुढे येत आहे. आज अनेक मराठी न्यूज चॅनल आणि
न्यूजपेपरच्या वेबसाईट्स आहेत. त्यामध्ये सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत,
लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रे, एबीपी माझा, आयबीएन लोकमत इत्यादी न्यूज चॅनल्सचा
समावेश आहे. आजची तरूण पिढी सतत मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटमध्ये व्यस्त असते.
त्यामुळे त्यांना वृत्तपत्रे वाचायला वेळच नसतो. तसेच ऑफिसच्या कामासाठी दिवसभर
घराबाहेर राहणा-या लोकांना टीव्ही पाहायलादेखील वेळ नसतो. अशा वेळी सतत अपडेटेड
असणा-या वेबसाईट्सचा ते वापर करतात. यामुळे वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्स यांचा
वाचकवर्ग हळूहळू वेबसाईट्सकडे वळत आहे.
कोणतीही घटना घडली की
पुढच्या मिनिटाला ती वेबसाईट्सवर अपडेट होते. वेबसाईट प्रत्येक क्षणाला अपडेट असून
त्यावर कमीत कमी आणि सोप्या शब्दांत जस्तीत जास्त अपडेटेड माहिती उपलब्ध असते.
इंटरनेट चालू असणारा प्रत्येक व्यक्ती वेबसाईटवर बातम्या पाहू शकतो. आजपासून काही
वर्षांनंतर प्रत्येकाच्या घरात कम्प्यूटर, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल आणि त्यामध्ये
इंटरनेट असून प्रत्येकजण त्यामध्ये बातम्या वाचताना दिसणार आहे. वेबसाईट्सच्या
वाढत जाणा-या वाचकवर्गामुळे आणि इंटरनेटचा वाढता वापर पाहती वेब पत्रकारितेचे वाढते
भवितव्य लक्षात येते.

No comments:
Post a Comment