Saturday, 18 May 2013

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब जर्नलिझम अभ्यासक्रमाचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स

प्लस पॉइंट्स
– पत्रकिरतेचा आणखी एक वेगळा प्रकार समजला.
– खूप काही नवीन शिकायला मिळाले
- वेब साईट्सच्या ऑफिसला भेट दिली
- करियरला नवी आणि चांगली दिशा मिळाली.
- स्वतःची वेबसाईट बनवायला शिकले

मायनस पॉईंट्स
- प्रॅक्टिकल लेक्चरकडे भर हवा होता, तो मिळाला नाही
- किमान 5 लॅपटॉपची व्यवस्था असायला हवी होती
- नेटची व्यवस्थित सोय नव्हती
- काही लेक्चर्सना गरजेपेक्षा जास्त महत्व देण्यात आले
- वेळेचे बंधन होते. प्रत्येक लेक्चरसाठी किमान 2 तास असायला हवे होते

पाच ते दहा वाक्यांत माहिती



इंटरनेट ब्राऊझर्स – इंटरनेट ब्राऊझर हे इंटरनेट वापरण्याचे एक साधन आहे. इंटरनेट ब्राऊझर्सशिवाय आपल्याला नेट वापरता येत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट ब्राऊझर्स उपलब्ध आहेत. उदा. इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला, गुगल क्रोम, ओपेरा मिनी, युसी ब्राऊझर इत्यादी. या इंटरनेट ब्राऊझर्सचा वापर करून आपण कोणतीही साईट सहज चालू करू शकतो. जसजसा काळ पुढे जात राहतो तसतसे अनेक नवीन इंटरनेट ब्राऊझर्स उदयाला यतात. हे ब्राऊझर्स कम्प्यूटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट आदींमध्ये उपलब्ध असतात.

इ) गूगल – गूगल ही एक वेबसाईट आहे. यामध्ये आपण कोणतीही माहिती सहजरित्या शोधू शकतो. वेगवेगळ्या बातम्या, फोटो, माहिती, ऑनलाईन खेळ खेळू शकतो.

ई) मोबाईल इंटरनेट – मोबाईल इंटरनेटचा वापर आपल्याला प्रवासात किंवा घराबाहेर असताना होतो. कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारे आपण इंटरनेट वापरू शकतो. फेसबूक, यू ट्यूब वापरू शकतो. तसेच खेळ खेळू शकतो. आपले मेल चेक करू शकतो.

उ) ई पेपर – ई पेपर हा असा प्रकार आहे, ज्यामुळे आपण जगाच्या कोणत्याही कोप-यात असताना कोणतेही वर्तमानपत्र वाचू शकतो. अमेरिकेत राहून महाराष्ट्रातील एखादा मराठी वर्तमानपत्र वाचण्यासाठी ई पेपरचा उपयोग होतो. मराठीमध्ये अनेक ई पेपर उपलब्ध आहेत. उदा. सकाळ, लोकसत्ता, पुण्य नगरी इत्यादी.

वेब जर्नलिझम अभ्यासक्रमासाठी ज्यांची लेक्चर्स झाली, अशा जास्तीत जास्त व्याख्यात्यांची नावे


- झी 24 तास या वेबसाईटचे इन्चार्ज प्रशांत जाधव

- दूरदर्शनच्या वृत्तसंपादिका सरस्वती कुवळेकर

- बीना तेंडुलकर – सायबर क्राईम

- श्री रणसुबे – फोटोशॉप


- निलेश बने – महाराष्ट्र टाईम्स वेबसाईट

- योगेश - लोकमत वेबसाईट

- कमलेश सावल – ऍडवर्टायजिंग रेवेन्यू

- सुरेशचंद्र वैद्य - महाराष्ट्र टाईम्स लिगल करस्पॉंडंट

- मंदार फणसे – भारत 4 इंडिया वेबसाईट

- संतोष टाकळे – पीआर एजन्सी

- जयप्रकाश नायर – ई-पेपर

मराठी वेब पत्रकारिता आणि या पत्रकारितेचे भवितव्य


पत्रकिरतेत टीव्ही, वृत्तपत्रे या माध्यमांप्रमाणेच आता वेब पत्रकारितादेखील पुढे येत आहे. आज अनेक देशांमधील वृत्तपत्रे बंद झाली असून तेथे केवळ वेब पत्रकारिती हा प्रकारच प्रचलित आहे. त्यामध्ये सीएनएन, एनडीटीव्ही, बीबीसी अशा न्यूज चॅनलच्या वेबसाईट, टाईम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाईम्स, डीएनए अशा न्यूजपेपरच्या वेबसाईट तसेच पीटीआय, टीएनएन अशा न्यूज एजन्सीच्या वेबसाईट यांचा समावेश आहे.

इंग्रजी वेब पत्रकारितेप्रमाणेच आता मराठी वेब पत्रकारितादेखील हळूहळू पुढे येत आहे. आज अनेक मराठी न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरच्या वेबसाईट्स आहेत. त्यामध्ये सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रे, एबीपी माझा, आयबीएन लोकमत इत्यादी न्यूज चॅनल्सचा समावेश आहे. आजची तरूण पिढी सतत मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटमध्ये व्यस्त असते. त्यामुळे त्यांना वृत्तपत्रे वाचायला वेळच नसतो. तसेच ऑफिसच्या कामासाठी दिवसभर घराबाहेर राहणा-या लोकांना टीव्ही पाहायलादेखील वेळ नसतो. अशा वेळी सतत अपडेटेड असणा-या वेबसाईट्सचा ते वापर करतात. यामुळे वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्स यांचा वाचकवर्ग हळूहळू वेबसाईट्सकडे वळत आहे.

कोणतीही घटना घडली की पुढच्या मिनिटाला ती वेबसाईट्सवर अपडेट होते. वेबसाईट प्रत्येक क्षणाला अपडेट असून त्यावर कमीत कमी आणि सोप्या शब्दांत जस्तीत जास्त अपडेटेड माहिती उपलब्ध असते. इंटरनेट चालू असणारा प्रत्येक व्यक्ती वेबसाईटवर बातम्या पाहू शकतो. आजपासून काही वर्षांनंतर प्रत्येकाच्या घरात कम्प्यूटर, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल आणि त्यामध्ये इंटरनेट असून प्रत्येकजण त्यामध्ये बातम्या वाचताना दिसणार आहे. वेबसाईट्सच्या वाढत जाणा-या वाचकवर्गामुळे आणि इंटरनेटचा वाढता वापर पाहती वेब पत्रकारितेचे वाढते भवितव्य लक्षात येते.

हॉटेलमधील वस्तू चोरण्यात भारतीय तिस-या क्रमांकावर


मेलबर्न – परदेशात अथवा कोठेही दूर फिरायला गेल्यावर तेथील हॉटेलमध्ये राहणा-या पर्यटकांपैकी असे अनेक पर्यटक असतात जे हॉटेलमधील वस्तू अगदी बिनधास्तपणे चोरून नेतात. अशा पर्यटकांमध्ये कोलंबियाचे पर्यटक अव्वल स्थानावर असून भारतीय पर्यटकदेखील पुढे आहेत. हॉटेलमधील छोट्या-मोठ्या वस्तू चोरण्यात भारतीय पर्यटक तिस-या क्रमांकावर असल्याचे एका ग्लोबल सर्व्हेमध्ये सिद्ध झाले आहे.

उचला-उचली करणा-या पर्यटकांपैकी 35 टक्के पर्यटक महागडी आणि वेगळ्या प्रकारची कॉफी तसेच चादरी, नॅपकीन अशा प्रकारच्या वस्तू चोरून नेतात. हॉटेलमध्ये वाचण्यासाठी ठेवलेले मॅगझीन, पुस्तके जास्त प्रमाणात चोरून नेली जातात, असे एका ‘ऑनलाईन अकोमोडेशन बुकिंग सर्व्हिस’ च्या तर्फे घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जानेवारी 2013 मध्ये केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात 28 देशांतील 8600 पर्यटकांचा समावेश करण्यात आला होता. त्यात कोलंबियाचे पर्यटक प्रथम क्रमांकावर असून त्यातील 57 टक्के लोकांनी आपण स्वतः असे प्रकार करत असल्याचे कबूल केले आहे. दुस-या क्रमांकावर मेक्सिकोचे पर्यटक (40 टक्के) असून तिस-या क्रमांकावर भारतीय पर्यटक (38 टक्के) आहेत. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांतील पर्यटक चौथ्या क्रंमांकावर (34 टक्के) असून 26 टक्के ब्रिटीशदेखील उचला-उचली करण्यात पाचव्या क्रमांकावर आहेत.

डेन्मार्कमधील 65 टक्के लोकांनी आपण हॉटेलमधील वस्तू चोरत नसल्याची कबुली दिली असली तरी डेनिशमधील पर्यटक फार इमानदार असून तेथील 88 टक्के नागरिकांनी कधीही हॉटेलमधून कोणतीही वस्तू न चोरल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.